दापोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सोमपवापर्यंत १, तर दि. २० रोजी तब्बल २४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसांत एकूण २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी केळशी-२, पालगड-१, हर्णे-१, जालगाव-४, कोळबांद्रे-१ आणि दाभोळ-२ असे एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत समिती गणांसाठी केळशी-१, जुईकर मोहल्ला-१, पालगड-१, खेर्डी-१, गिम्हवणे-१, हर्णे-१, जालगाव-३, टेटवली-१, कोळबांद्रे-१, पांगारी तर्फे हवेली-१, बुरोंडी-१ आणि दाभोळ-१ असे एकूण १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी व जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 22/Jan/2026














