रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती. रत्नागिरी तालुक्यातील 20 पं.स. गणासाठी 51 अर्ज आले असून जि.प.च्या 10 गटांसाठी 38 अर्ज दाखल झाले आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत हे सध्या दावोस येथे असून, त्यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेची शेवटची यादी रात्री जाहीर करण्यात आली.
शेवटच्या दिवशी गोळप पंचायत समिती गणामधून पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 गटांमध्ये 38 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर पंचायत समितीच्या 20 गणांसाठी 51 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी अर्जांची छाननी होणार असून 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
राज्यात पहिल्याच पंचायत समितीमध्ये रत्नागिरीत बिनविरोध
रत्नागिरी तालुक्यातील नाणिज पंचायत समिती गणामधून शिवसेनेच्यावतीने डॉ. पद्मजा संजय कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात कोणत्याच पक्षाने उमेदवार न दिल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत. महाराष्ट्रात त्या पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्या बिनविरोध उमेदवार ठरल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 22-01-2026














