भाजपच्या लांजा-राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांचा राजीनामा

लांजा : भाजपच्या लांजा-राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याने ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. गेली पाच वर्षे लांजा- राजापुरात उल्का विश्वासराव यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन पक्षाचा राजीनामा दिल्याचे समजते.

लांजा-राजापूर विधानसभेची उमेदवारी भाजपकडून उल्का विश्वासराव यांना मिळावी यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती.

विकासकामांच्या माध्यमातून विश्वासराव यांनी लांजा-राजापूर मतदार संघामध्ये भाजप पक्ष घरोघरी पोहचवला. त्यामुळे भाजपकडून विश्वासराव या उमेदवारीच्या दावेदार ठरत होत्या. मात्र, महायुतीकडून शिवसेनेचे शिंदे गट) किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आल्याने उल्का विश्वासराव या नाराज झाल्या आहेत.

दरम्यान, उल्का विश्वासराव या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली असून, विश्वासराव यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या पक्षाचा व पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केला सांगितले. असल्याचे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 29/Oct/2024