माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण मंदिरात रथसप्तमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे उत्सवाचे १०६ वे वर्ष आहे. १९ ते २२ जानेवारी पर्यंत धार्मिक कार्यक्रमानी उत्सव् साजरा होत आहे. तर २३ ते २५ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांनी उत्सव रंगणार आहे.
मंदिरात दररोज सकाळी सौर लघुरुद्र, दुपार, सायंकाळी आरती मंत्रपुष्प होणार आहे. तर २३ रोजी सायंकाळी ५ वाजता वर्दीतील किस्से या विषयावर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रविकिरण पराडकर संवाद साधणार आहेत. रात्री १० वाजता भिवंडी च्या अभय बुवा घांग्रेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर २४ रोजी सायंकाळी ५.३० वा. महिलांसाठी हळदीकुंकू होईल. तर रात्री १० वाजता विघ्नेश जोशी यांचा इथे कर आमुचे जुळती हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कल्याणी जोशी, धनंजय म्हसकर, ओंकार प्रभुघाटे, श्वेता जोगळेकर, हेरंब जोगळेकर, मिलिंद लिंगायत, उदय गोखले, विनय चेऊलकर, आदी सह कलाकार असणार आहेत.
तर २५ रोजी रथसप्तमी दिनी सकाळी ७वा पालखी सोहळा होईल. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अखंड गायत्री मंत्राचा जप होणार आहे. तर दुपारी महाप्रसाद व रात्री पोंक्षे कुटुंबियांचा रंगल्या रात्री अशा हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल. श्री सूर्यनारायणाच्या उत्सवानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष अशोक पोंक्षे व सेक्रेटरी सतीश पोंक्षे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 22/Jan/2026














