रत्नागिरी : कोतवडे सनगरेवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास करण्यात आली.
प्रदीप धर्मराज वारेकर (वय ५३, रा. कोतवडे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल सुरेश कुसाळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा सोमवारी सायंकाळी आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पीत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 22/Jan/2026














