गुहागर : गुहागर बाजारपेठ ते दुर्गादेवी देवस्थानपर्यंत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम गुरुवार, दि. २२ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून राबवण्यात येणार आहे. गुहागर समुद्रकिनारी ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळणार आहे. यासाठी समुद्रकिनारी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी सकाळी नगरपंचायत, बोरोसिल कंपनी, महाविद्यालये व नागरिक यांच्यावतीने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगराध्यक्ष नीता मालप व बोरोसिल कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 22/Jan/2026














