खेडमध्ये जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणांसाठी ४० उमेदवारी अर्ज दाखल

खेड : जि. प.-पं. स. निवडणुकीसाठी मंगळवारी तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यात जिल्हा परिषद गटांसाठी एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर पंचायत समिती गणांसाठी विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी एकूण २९ अर्ज दाखल केले.

जिल्हा परिषद गट सुकीवलीतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विनायक निकम, उबाठा सेनेचे रामचंद्र आखाडे, भडगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) अजय बिरवटकर, दयाळमधून शिवसेनेचे अरुण कदम, तर उबाठा सेनेचे अजिंक्य मोरे, विराचीवाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अंजली खापरे व उबाठा सेनेच्या स्पृहा चांदिवडे, लोटेतून शिवसेनेच्या आदिती खाडे, तर उबाठा सेनेच्या अंकिता सोलकर, धामणदिवीतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या सानिका आंग्रे व उवाठा सेनेच्या प्रीती मनवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पंचायत समिती निवडणुकीसाठी विविध गणांमधून मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सुकीवली गणातून सायली गोमले (उबाठा सेना), तिसंगी गणातून किशोर जाधव (उबाठा सेना), भरणे गणातून भाजपचे नीलेश बामणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे चंद्रशेखर हेळगावकर, भडगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कुलदीप पवार, तर जामगे गणातून अपूर्वा जाधव (राष्ट्रवादी अजित पवार) यांनी अर्ज दाखल केला. दयाळ गणातून उबाठा सेनेच्या स्वाती कदम व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सबिहा दुदुके, बहिरवली गणात सर्वाधिक चुरस दिसून आली. उबाठा सेनेचे बशीर हून व सईद हमदुले, काँग्रेसचे अजीम सुर्वे, शिवसेनेचे निसार सुर्वे व शहानवाज सुर्वे यांनी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय खालिद परकार यांनी भाजप व अपक्ष असे दोन वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल करून लक्ष वेधले आहे.

गुणदे गणातून रत्नाकर कारेते (अजित पवार राष्ट्रवादी), अपक्ष संतोष पाटोळे तसेच विष्णू आंब्रे (उबाठा सेना), विराचिवाडी गणातून उमेश देवरुखकर (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) व मधुकर शिंगे (काँग्रेस), लोटे गणातून उबाठा सेनेचे अजय चाळके व नितीन कडू यांनी अर्ज दाखल केले.

आंबडस गणातून अमिता बने (उद्धव सेना), अंजनी गणातून अफिया पालेकर (शिवसेना), आकांक्षा मोरे (अजित पवार राष्ट्रवादी), राबिया जासनाईक (काँग्रेस) व ताजबेगम देसाई (उबाठा सेना), धामणदेवी गणातून समृद्धी गोठल (अजित पवार राष्ट्रवादी) व रेवती घाग (उबाठा सेना) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

राजकीय हालचालींना वेग…
एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने खेड तालुक्यात निवडणूक वातावरण तापले असून पुढील दिवसांत आणखी उमेदवार अर्ज दाखल करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध पक्षांकडून शक्तिप्रदर्शन, बैठकांमुळे तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 22/Jan/2026