रत्नागिरी : रोजगार हमी विभागाचे नवीन हॉर्टी अॅप

रत्नागिरी : कामाचा निपटारा झटपट व्हावा, त्यामध्ये पारदर्शकता असावी, यासह शेतकऱ्यांना कामासाठी हेलपाटे मारायला लागू नये, यासाठी रोजगार हमी योजना विभागातर्फे नवीन हॉर्टी अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये बागायती लागवड व सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा जाहीर झाल्यापासून फळबाग लागवडीला चालना मिळाली. बागायतीसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने विहीर पाडण्यासाठी शासनाकडून अनुदान सवलत देण्यात येते. घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळ, पैशाची बचत होत आहे. या योजनेचा लाभ ऑनलाईनही घेता येणार आहे. यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 29/Oct/2024