मुंबई : 26 जानेवारीला देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करणार याबाबतची माहिती शासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.
सरकार एक परित्रक जाहीर केलं आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान,रायगड आणि नाशिक जिल्ह्यात दरवेळी ध्वजारोहणाच्या वेळी चर्चा होत होती. यावेली रायगड मुख्यालयातील ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना मिळाला आहे. तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन हे शासकीय ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


गोगावले यांची अधुरी इच्छा पूर्ण
पालकमंत्री पदाचा रायग आणि नाशिक जिल्ह्यात आहे. 77 व्या प्रजासत्ताक दिनी रायगड मध्ये मंत्री भरत गोगावले ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर नाशिक मध्ये मंत्री गिरीश महाजन हे शासकीय ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रायगडचे पालक मंत्री पद स्थगित झाल्यापासून रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील शासकिय ध्वजारोहणावरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सी खेच सुरु होती. गतवर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र दिनी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या मुख्यालयाचे ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला होता. नाराजी व्यक्त करत मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांचा निर्णय मान्य केला केला होता. आता या वर्षी प्रजासत्ताक दिनी कोणाला मान मिळणार यावरून चर्चा सुरु असताना मंत्रालयाच्या सामान्य प्रशासनाने परिपत्रक काढत यादी जाहिर केली असून यामध्ये रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला आहे. यामुळे गोगावले समर्थकांमध्ये आनंदाच वातावरण पहायला मिळत आहे. गोगावले यांची अधुरी इच्छा आता पूर्ण झाली आहे.
महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगडच्या (Raigad) पालकमंत्री पदावरुन अनेक दिवसांपासून नाराजीनाट्य असल्याचं पाहायला मिळालं होतं. या वादाची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा होत आहे. सध्या तरी रायगडच्या पालकमंत्रीपदावर कुठल्याही मंत्र्याची नियुक्ती केली नाही. मात्र, 15 ऑगस्ट 2025 रोजी ध्वजारोहण करण्याचा मान पुन्हा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला होता. त्यामुळं रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार नाराज झाले होते. मंत्री भरत गोगावले यांनी ध्वजारोहणाचा मान द्यावा असी मागणी त्यांनी केलं होती. तसेच पालकमंत्रीपद देखील भरत गोगावले यांना मिळावे अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली होती. दरम्यान, रायगडचा पालकमंत्री कोण हे जरी ठरलं नसलं तरी यावेळी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मान रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 22-01-2026














