Gold Silver Rate : सोने- चांदीचे दर गडगडले! पटपट करा चेक..

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार तेजी सुरु होती. दररोज सोने आणि चांदीचे दर नवे उच्चांक गाठत होते. अखेर गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

चांदीचे दर 20000 रुपयांनी कोसळले. तर, सोन्याचे दर 4000 रुपयांनी कमी झाले आहेत.

चांदीच्या 5 मार्चच्या एक्सपायरीच्या वायद्याचे दर बुधवारी 325602 रुपयांवर पोहोचले होते. त्यात आज 19849 रुपयांची घसरण होऊन ते 305753 रुपयांवर पोहोचले.

सोन्याच्या दरात देखील आज घसरण झाली आहे. सोन्याचे दर 4085 रुपयांनी कमी होऊन 148777 रुपयांवर आले आहेत. सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचं प्रमुख कारण डोनाल्ड ट्रम्प यांच ग्रीनलँड आणि यूरोप संदर्भातील बदललेलं धोरण कारणीभूत आहे.

सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर देखील घसरले आहेत. सराफा बाजारात चांदीचा दर 15513 रुपयांनी घसरला. जीएसटीसह चांदीचा दर 312691 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 2728 रुपयांची घसरण झाली. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर 156043 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 2499 रुपयांनी कमी होऊन 138773 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 142936 रुपये आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 22-01-2026