Ratnagiri : गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर येथे माघी गणेश जयंतीनिमित्त आज दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. यानिमित्त आज विविध कार्यक्रमही आयोजित केले होते. सकाळी ६.३० वाजता स. विधिवत गणेश पूजन, मंत्रपुष्पांजली, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती झाली. सकाळी ९ वाजता गुरुकृपा मॉकटेल अँड मोअरचे हदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून सरबत वाटप करण्यात आले. दुपारी १२ वाजेपर्यंत कीर्तनकार हभप उल्हास लाड (कसोप) यांचे जन्मोत्सव कीर्तन झाले. त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी हदय लाड व रामचंद्र बांगर यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आले. सार्थक गुळेकर यांच्याकडून लाडू वाटप, तर अजय नागवेकर यांच्याकडून पाणी बाटलीचे वाटपकरण्यात आले. त्यानंतर बुवा दामोदर लोकरे (मुंबई) यांनी आणि त्यानंतर गणेशगुळे येथील काडसिध्देवर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदेश तोडणकर यांनी भजन सेवा सादर केली.

सायंकाळच्या सत्रात आरती तसेच देणगीदार, नाटककार यांचे आभार प्रदर्शन व क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. रात्री १० वाजता मन हेलावून टाकणारी आणि समाज मनाला भिडणारी प्र. ल. मयेकर लिखित आणि प्रकाश विष्णू लाड दिग्दर्शित दोन अंकी ज्वलंत शोकांतिका नाटक ‘वास्तव’ लाड ऐक्यवधक नाट्य मंडळ (मुंबई) यांच्या वतीने सादर केले जाणार आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळेचे अध्यक्ष प्रसाद तोडणकर, उपाध्यक्ष प्रज्योत गुळेकर, सचिव प्रथमेश रांगणकर, उपसचिव ओंकार वजरेकर, खजिनदार जितेंद्र तोडणकर, सहखजिनदार शैलेश जोशी, कार्याध्यक्ष विक्रम गुरव, उपकायाध्यक्ष संदेश मावळकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 22/Jan/2026