रत्नागिरी : दारुला पैसे न दिल्याच्या रागातून मुलगी आणि साक्षीदाराला दगडी लादीच्या तुकड्याने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवार 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. सुमारास झारणीरोड येथे घडली. सागर सुरेश गुरव (45, रा. झारणीरोड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात मुगली ऐश्वर्या सागर गुरव (21, रा. झारणीरोड, रत्नागिरी) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी दुपारी संशयित सागर गुरवने मुगली ऐश्वर्या आणि साक्षीदाराकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर त्यांनी आमच्याकडे पैसे नाहित असे सागरला सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने सागरने घरातील बाथरुमच्या बाजुला ठेवलेला दगडी लादीचा तुकडा उचलून तो ऐश्वर्याच्या डोक्यात मारुन दुखापत केली. त्यावेळी साक्षिदाराने त्यांची सोडवा-सोडव केली असता सागरने दोघांनाही ठार मारुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 22/Jan/2026














