सोलापूर : वसंत पंचमी दिवशी शुक्रवारी (दि.23) परंपरेनुसार होणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्याची लगीनघाई सुरू झाली आहे. यानिमित्त विठ्ठल मंदिरात व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषराई करण्यात आली आहे.
लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना पंचपक्वांनांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सायंकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तीची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे या शाही विवाह सोहळ्याची वऱ्हाडी मंडळींना ओढ लागली आहे.
पंढरपूर येथे माघ शुद्ध 1 ते 5 या कालावधीत संपन् होणाऱ्या श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या चार दिवसांपासुन श्री रूक्मिणी स्वयंवर कथा सांगण्यात येत आहे. दुपारी 4 ते 6 या वेळेत या कथेचे निरूपण पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद् भागवताचार्य साध्वी अनुराधा राजेंद्र शेटे करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 22-01-2026














