चिपळूण : तालुक्यातील एका शिक्षकाने दोन महिलाचे अश्लील बनावट फोटो ‘मॉर्प’ पद्धतीने तयार केले. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीशीही गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पांडुरंग गोविंद डाकरे (५७, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत फिर्याद त्या महिलांनी चिपळूण पोलिसात दिली आहे.
पांडुरंग डाकरे हा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. २० जानेवारी रोजी त्याने दोन महिलांचे वाईट उद्देशाने फोटो बनावट पद्धतीचे मॉर्प करून अश्लील अवस्थेत मोबाईलमध्ये ठेवले. त्यामध्ये पालक महिलेचा देखील समावेश आहे. याबरोबरच त्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी देखील गैरवर्तन केले. हा प्रकार पालकांसह ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्या शिक्षकाला त्यांनी जाब विचारला. यानंतर याप्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलिस स्थानकात पोक्सोसह अॅट्रोसिटी तसेच माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले करीत आहेत. सेवानिवृत्तीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असताना हा प्रकार उघडकीस आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 23/Jan/2026














