चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील खेर्डी नजीक मालवाहू रेल्वेच्या धडकेने एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २.३५ वाजण्याच्या सुमारास घडली. संजय चंद्रकांत मोरे (४५, पिंपळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या घटनेची माहिती चिपळूण पोलीसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले होते. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात आणण्यात आला. याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 23/Jan/2026














