मंडणगड : तालुक्यातील वेसवी येथील प्रसिद्ध श्री काळंबा देवी संस्थानच्या मंदिरातील दानपेटी चोरट्याने चोरून नेली. २१ जानेवारी २०२६ रोजी मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याची तक्रार देवस्थानचे पुजारी योगेश खाडे यांनी बाणकोट सागरी पोलिस स्थानकात नोंदवली आहे.
या संदर्भात पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार, दि. २० जानेवारी सांयकाळी ६.०० ते २१ रोजी सकाळी ६.०० वाजण्याच्या दरम्यान चोरट्याने मंदिरातील दानपेटी मंदिरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरुन नेली. दानपेटीत सुमारे १५ हजारांची रक्कम असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बाणकोट पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस हवालदार श्री. आळे अधिक तपास करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 23/Jan/2026














