चिपळूण : नाशिक महानगरपालिकेत उपायुक्त असलेले संजय जाधव यांनी चिपळूण न.प. च्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे घेतली आहेत. यापूर्वी विशाल भोसले यांनी चिपळूण न.प. तील सर्व कर्मचारीवर्गाचे त्यांच्या प्रशासकीय कालावधीत दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून पदभार सोडला. दुपारनंतर न.प. चे नूतन मुख्याधिकारी जाधव यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. न.प.चा दोन वर्षे प्रशासकीय कारभार करणारे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर न.प. मध्ये बदली झाल्याने त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार जाधव यांनी गुरुवारी आपल्या पदाची सूत्रे घेतली.
यावेळी त्यांनी सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधला. तसेच न.प.तील सर्व कर्मचारी, विभागप्रमुखांनी जाधव यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता, चिपळूण आणि कोकणची आपल्याला माहिती असून यापूर्वी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे चार वर्षे काम केले असल्याचे व न चिपळूण शहराच्या विकासात सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करण्याची आपली इच्छा असल्याने सर्वांच्या सहकार्याबरोबरच शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. नगर परिषदेला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने याच काळात मुख्याधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळत असल्याने जाधव यांनी आनंद व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 23/Jan/2026














