आज वसंत पंचमीनिमित्त होणाऱ्या परब्रम्ह पांडुरंग आणि रुक्मिणी देवी यांच्या स्वर्गीय विवाह सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिर नववधूप्रमाणे फुलांनी सजलं आहे. यंदाचा हा स्वर्गीय विवाह सोहळा मनमोहक फुलांनी सजलेल्या मयूर विधिमंडपात पार पडणार आहे.
विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त पुणे येथील विठ्ठलभक्त भारत भुजबळ यांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात, चौखांबी, श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभामंडप आदी प्रमुख ठिकाणी अत्यंत आकर्षक व देखणी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
या सजावटीसाठी सुमारे चार ते पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.

यामध्ये गुलाब, अस्टर, लाल आणि पिवळ्या रंगाचे झेंडू, जरबेरा, ऑर्किड, शेवंती यांसारख्या विविध प्रकारच्या तसेच रंगांच्या फुलांचा समावेश आहे.
संपूर्ण सजावट अत्यंत कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली असून यासाठी 50 ते 60 कुशल कारागिरांनी तब्बल 48 तास परिश्रम घेतले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 23-01-2026













