Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून लैंगिक शोषण

Badlapur Crime News: बदलापूर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाच्या घटनेनं हादरलं आहे. बदलापुरात एका चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार (Badlapur Crime News) घडला आहे.

शाळेच्या व्हॅनमध्ये बसचालकाने लैंगिक शोषण केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना व्हॅन चालकाने तिच्यावर अत्याचार केला. घरी पोहोचल्यावर विद्यार्थिनीने आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणासह मारहाणही झाली होती. संतापलेल्या पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. ज्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला त्या व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संगीत चेंदवणकर यांनी केला. दरम्यान हा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळलीय. सदर घटनेनंतर बदलापूर पोलीस ठाण्यातही तणावाचं वातावरण होतं. (Badlapur School Girl Crime News)

नेमकं काय घडलं? (Badlapur School Girl Crime News)

बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे काय म्हणाले? (Badlapur Crime News)

सदर घटनेबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी माहिती दिली. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदर घटना येते. एका मुलीवर आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी अटकेत आहे, मुलीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. सदर प्रकार हा स्कुल व्हॅन मध्ये घडल्याची माहिती आहे.ही स्कुल व्हॅन खासगी शाळेची होती, पोलिस चौकशी करून पुढील कारवाई करतोय. सदर घटनेत फिर्यादीने माहिती दिली की सदर आरोपीने दुपारी 2-3 दरम्यान ड्रायव्हरने गुप्तांगाला हात लावला, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 23-01-2026