पुणे : राज्यातील पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार उमेदवारांना पदभरतीसाठी कमाल ५० जागांसाठी प्राधान्यक्रम नोंदवणे, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करणे, उमेदवाराचे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुण केवळ एक वेळच्या शिफारसीसाठी लागू राहतील, अशा बदलांचा समावेश असून, हे बदल अंमलबजावणी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५ आणि त्यानंतरच्या चाचणीनुसार केल्या जाणाऱ्या पदभरतीला लागू केले जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या रिक्त जागांवरील पदभरती पवित्र संकेतस्थळामार्फत केली जाते. पदभरतीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शी पद्धतीने काही तरतुदी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, या तरतुदींमुळे भरती प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित तरतुदी रद्द करून नव्या तरतुदी निश्चित करण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:09 23-01-2026














