Rajapur : २२ वर्षीय विवाहित नेपाळी महिलेची बागेत आत्महत्या

राजापूर : बकऱ्या चरविण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय विवाहित महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील शीळ येथील नारीस मालीम यांच्या आंबा बागेत घडला. विमला तपेंद्र बन्थोला (रा. चौकुने, सुर्खेत, नेपाळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ती बागेत बकऱ्या चरविण्यासाठी गेली होती. त्यानंतर सकाळी ११ वाजता तिचा पती बकऱ्या परत आणण्याकरिता गेले असता पत्नीने आत्महत्या केल्याचे दिसले. याप्रकरणी राजापूर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 23/Jan/2026