राजापूर : तालुक्यातील देवाचे गोठणे केरावळे शाळेने परसबागेची निर्मिती केली आहे. परसबाग स्पर्धेअंतर्गत मूल्यांकन करण्यात आले असून, शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ, पालक या सर्वानी परसबाग निर्मितीत सक्रिय सहभाग घेतला होता. या परसबागेत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून शालेय पोषण आहारात त्याचा नियमितपणे वापर केला जात आहे. यासाठी सहायक कृषी अधिकारी श्रीकांत भवर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी परसबागेत लागवडीसाठी विविध देशी भाजीपाला यांची बियाणी उपलब्ध करून दिली. तसेच केंद्रस्तरावर सर्व शाळांमधील शिक्षकांचे शिबिर घेऊन मार्गदर्शन केले. शाळेने तयार केलेल्या परसबागेचा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 23/Jan/2026














