रत्नागिरी : राज्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करून मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थ्यांना वगळण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार राज्यभर मिशन सुधार अभियान राबविण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मयत, दुबार नावे वगळण्यात आली आहे. तसेच संशयास्पद असणाऱ्या लाखो रेशनकार्डाची तपासणी करण्यात आली. ८०० हून अधिक नावे संशयास्पद वाटली असून यातील काही नावे कमी करण्यात अली तर काहींचे वय वाढवून नियमित करण्यात आले.
सहा महिने धान्य न उचलणाऱ्या लाभार्थ्यांचे नावे पडताळणी करून हजारो लावे कमी करण्यात आली आहे. तसेच ई-केवायसी न करणाऱ्या लाखो लाभार्थ्यांचे धान्य, नाव कमी होणार आहे. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत मोफत धान्य दिले जाते. मात्र या धान्याचा अनेकांकडून गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. निकषात न बसणाऱ्या अनेकजण मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. यामुळे अनेक गरजू, गरीब लाभार्थी अद्याप धान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मिशन सुधार योजनेसंदर्भात राज्य पुरवठा विभागाकडून धान्य न उचणाऱ्या, दुबार, मृत नावे कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग यंत्रणा जोरदार कामाला लागली असून कित्येक दुबार, मृत नावे वगळली आहेत. ई-केवायसी न केलेल्या कार्डधारकांवर ही कारवई होणार आहे.
२४ हजारहून लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार
रत्नागिरी जिल्ह्यातील डिसेंबर २०२४ ते मे २०२५ या सवर्षात सलग सहा महिन्यात धान्य न उचलेले १० हजार २२१ कार्डावरील २४ हजार ०३ लाभार्थ्यांचे नावे प्राधान्य कुटुंब योजनेतून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे धान्य बंद झाले आहे, तर काहींची कार्ड दुरुस्त करून पुन्हा धान्य घेण्यास सुरूवात केली आहे. यामुळे आणखी काही लाभार्थ्यांची नावे रेशनकार्डावर पुन्हा येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:39 PM 23/Jan/2026














