सावर्डेत दोन तास मुसळधार पाऊस

सावर्डे : दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या सावर्डेवासीयांना दुपारी पावणेतीननंतर वीज व मेघगर्जनेसह सुरू झालेल्या पावसाने दोन तास झोडपले. हा पाऊस अगदी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पडत राहिला. झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. रस्त्यांना ओहळाचे स्वरूप प्राप्त झाले. अचानक आलेल्या पावसाने शालेय विद्यार्थ्यांबरोबर नोकरीनिमित घराबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने लोकांना दिलासा मिळाला.

गेली काही दिवस या भागात पावसाने उसंत घेतली होती. कडक ऊन पडत होते. त्यामुळे पावसाने परतीचे वेध घेतले की, काय अशी शक्यता वर्तवली जात होती. हवेत उकाडा जाणवत होता. लोक घामाने चिंब होऊन पावसाच्या प्रतीक्षेत होते. सोमवारी सकाळपासून आकाश ढगाळ होते. त्यामुळे सायंकाळी पाऊस येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. दुपारी पावणेतीनच्या सुमारास
विजांच्या गडगडाटासह सुरुवात केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 24/Sep/2024