रत्नागिरी : गणपतीपुळे ते भंडारपुळे जाणाऱ्या रस्त्याशेजारी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७.२० वा. सुमारास करण्यात आली. दीपक मारुती जाधव (वय ३२, रा. पिरंदावणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल नीलेश गुरव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गणपतीपुळे ते भंडारपुळे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित हा दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 24/Jan/2026














