राजापूर : राजापुरात जिल्हा परिषदसाठी दोन, तर पंचायत समितीसाठी चार अर्ज अवैध ठरले आहेत. यामध्ये जुवाटी जि.प. गटात दीपक रामचंद्र चव्हाण आणि शिवाजी नारायण कानडे यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. पंचायत समिती गणामध्ये केळवली गणातून शिवानी शिवाजी कानडे यांचा अर्ज अवैध ठरला आहे.
तर धोपेश्वर गणातून योगेश गोपाळ नकाशे, नाटे गणातून नंदिनी नितीन कदम आणि कातळी गणातून सुनील मनोहर जठार यांचे दुबार अर्ज असल्याने ते अवैध ठरले आहेत. एकूण सहा अर्ज अवैध ठरल्यानं आता रिंगणात ६५ उमेदवारांचे अर्ज कायम असून त्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी १७, तर पंचायत समितीसाठी ४८ अर्जाचा समावेश आहे. राजापूर तालुक्यातील सहा जि.प. गट आणि बारा पंचायत समिती गणासाठी आता ६५ उमेदवार रिंगणात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 24/Jan/2026














