दापोली : दापोली तालुक्यातील भिवबंदर ते दाभोळ जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल ३५ लिटर गावठी हातभट्टीच्या दारुची वाहतूक करणाऱ्या विरोधात दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २२ जानेवारी रोजी दुपारी २ वा. सुमारास करण्यात आली. अजिंक्य दिलीप मोरे (वय ३३, रा. भिवबंदर, पोवणौशी, ता. दापोली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिला पोलिस कॉन्स्टेबल अक्षता गुजर यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, गुरुवारी दुपारी संशयित अजिंक्य हा आपल्या ताब्यातील ज्युपिटर दुचाकी (एमएच-०८ -एव्ही-५७२८) वरुन एका निळ्या कॅनमधून ३ हजार ५५० रुपयांची गावठी हातभट्टीच्या ३५ लिटर दारुची वाहतूक करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), मोटार वाहन कायदा कलम १८५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 24/Jan/2026














