संगमेश्वरात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७८ अर्ज

देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगमेश्वर तालुक्यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६५ अर्ज दाखल झाले. यामुळे एकूण अर्जाची संख्या ७८ झाली आहे.

कोसुंब व कडवई गटात भाजपा व सेना अशी मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. जिल्हा परिषद गटात धामापूरतर्फे संगमेश्वरमध्ये सुशील भायजे (काँग्रेस), सहदेव बेटकर (उबाठा), अजित कांबळे (वंचित आघाडी), जगन्नाथ राऊत (अपक्ष), कडवईत आशिष सुर्वे (काँग्रेस), संतोष थेराडे (उबाठा), विनोद मस्के (भाजपा), महेंद्र कापडी (अपक्ष), कसब्यात रचना महाडिक (शिवसेना), विजय कुवळेकर (उबाठा), मुचरीत ललिता तांबे (उबाठा), नुपुरा मुळ्ये (अपक्ष), माधवी गीते (शिवसेना), कोसुंबमधून चंद्रकांत मोरे (काँग्रेस), मुग्धा जागुष्टे (उबाठा), प्रमोद अधटराव (अपक्ष व भाजपा), रोहन बने (शिवसेना), साडवलीत नेहा माने (उबाठा), रूपाली कदम (भाजपा), शीतल करंबेळे (अपक्ष), दाभोळेतून विलास चाळके (शिवसेना), शंकर साळवी (अपक्ष), वीरश्री बेटकर (वंचित आघाडी) यांनी अर्ज भरले.

पं. स. धामापूरतर्फे संगमेश्वर गणातून अक्षय चव्हाण (अपक्ष), महेश जड्यार (भाजपा), अजय चव्हाण (उबाठा), प्रभाकर धनावडे (बळीराजा सेना), एकनाथ पवार (वंचित आघाडी), आरवलीत प्रिया सुवरे (काँग्रेस), समिता कुंभार (उबाठा), मधुकर गमरे (वंचित आघाडी), धनश्री मेणे, कडवईत अपर्णा जाधव (उबाठा), मिताली कडवईकर (काँग्रेस), मानसी जाधव (अपक्ष), सुचिता कदम (शिवसेना), धामणीतून दत्ताराम लाखण (उबाठा), अमित ताठरे (अपक्ष), चंद्रकांत कदम (काँग्रेस), संतोष भडवळकर (काँग्रेस), सुजित सुर्वे (आप), कसबा संगमेश्वरात जितेंद्र पेंढारी (अपक्ष), चंद्रकांत फणसे (उबाठा), संदेश झिमन (अपक्ष), सुरेश माईन (शिवसेना), अनंत शिवगण (शिवसेना), संजय सुर्वे (काँग्रेस), मुचरीत मधुर निकम (अपक्ष), प्रथमेश वेल्ये (शिवसेना), पूजा शीतल (उबाठा), माभळेत दिलीप गीते (उबाठा), सुहास मायगडे (शिवसेना), दिलीप पेंढारी (उबाठाकडून दोन), मुचरीत प्रज्ञा गमरे (उबाठा), आरुषी घवाळी (काँग्रेस), माधुरी धामणे (अपक्ष), कोसुंबमध्ये तबस्सुम खाचे (अपक्ष), सुहासिनी भातडे (उबाठा), दुर्वा पाष्टे (भाजपा), निवे बुद्रूकमध्ये प्रफुल्ल बाईत (राष्ट्रवादी अजित पवार), सुरेश गुरव (उबाठा), सुरेश घडशी (अपक्ष), साडवलीत तृप्ती मांगले (शिवसेना), क्षमा जाधव (उबाठा), शीतल करंबेळे (अपक्ष), हातीवमध्ये मंगेश बांडागळे (राष्ट्रवादी), प्रदीप ढवळे (उबाठा), दाभोळेत प्राजक्ता साळवी (सेना), अपेक्षा दाभोळकर (अपक्ष), दीपाली जाधव (सेना), सुप्रिया कांबळे (वंचित), कोंडगाव जयसिंग माने (सेना), विद्याधर तांदळे (उबाठा), दिलीप बेर्डे (काँग्रेस) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 24/Jan/2026