चिपळूण : नगर परिषदेच्या उक्ताड येथील अटलबिहारी वाजपेयी वाहनतळाची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनांची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी केली आहे. बुधवारी या वाहनतळाच्या तिन्ही बाजूने गेट सुरक्षित करण्यात आले असून गेट बंद करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.
उक्ताड येथील हा वाहनतळ चार वर्षांपासून वापराविना आहे. तसेच तिन्ही बाजूंनी गेट नसल्याने न.प. मालकीच्या मालमत्तेचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सकपाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गेट बसवून मालमत्तेची निगा राखण्याचे आदेश दिले होते. यानंतर तातडीने तिन्ही गेट सुरक्षित करण्यात आले आहेत.
दरम्यान, हे वाहनतळ वाहनचालकांच्या प्रत्यक्ष उपयोगात येत नसल्याने भविष्यात या जागेचा वापर करून न.प.ना उत्पन्न मिळवता येईल का, याबाबतही विचार सुरू आहे. या संदर्भातील विषय लवकरच होणाऱ्या नगर परिषद कौन्सिल बैठकीत सभागृहासमोर मांडण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सकपाळ यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 24/Jan/2026














