चिपळूण-पेढे-लोटेकरिता स्वतंत्र बस सुविधा सुरू

चिपळूण : पेढे येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चिपळूण-पेढे-लोटे अशी स्वतंत्र बस सुविधा सुरू करण्यात आली आहे. परशुराम लोटे व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी स्वतंत्र बस द्यावी यासाठी अनेक वर्षे संस्थेचे प्रयत्न सुरू होते. अखेर एसटी महामंडळाने एसटी बस उपलब्ध केली आहे.

या बसच्या शुभारंभप्रसंगी भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ सरचिटणीस सुनील गमरे, उपाध्यक्ष गोपीनाथ रेपाळ, संचालक प्रवीण पाकळे, सुधीर भोसले, मुख्याध्यापक विनायक माळी, पर्यवेक्षक विशाखा माळी, चिपळूण आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, प्रशासनातील अधिकारी काजरोळकर, एसटीचे वाहक आर. एन. अन्सारी, चालक श्री. सावंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदेश पवार यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 24/Jan/2026