लांजा : तालुक्यातील शिपोशी येथे आदिशक्ती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरणा बाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पर्यवेक्षिका स्वाती पाटील यांनी महिला सक्षमीकरण बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रांजल जाधव यांनी हुंडा बळीवर आधारित गीत सादर केले. महिला आरोग्य व शासकीय योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला श्री. लोखंडे, श्री. शिवगण, अंगणवाडी सेविका, आशा, बचत गटाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, महिला वर्ग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा खांदारे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 24/Jan/2026














