Uddhav Thackeray: मेलो तरी बेहत्तर पण दोन व्यापाऱ्यांचा गुलाम होणार नाही – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : ठाकरे नाव पुसायला अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत, पण ते पुसलं जात नाही असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. गद्दार हा विषय आजचा नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यापासून चालू आहे.

आपलीच लोक आपल्यावर घाव घालण्यासाठी दोन गुजराती लोक वापरत आहेत. यावेळेस मुंबईच्या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मेलो तरी बेहत्तर पण दोन व्यापाऱ्यांचा गुलाम होणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिवचलं आहे.

मुंबईवरचा भागवा उतरवून ह्यांना काय मिळालं?

मुंबईवरचा भागवा उतरवून ह्यांना काय मिळालं? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मुंबईचे लचके हे हरामखोर गुजराती तोडत असतील तर मी शांत बसणार नाही अशी टीका देखील उद्दव ठाकरेंनी केली. कोणती आपत्ती आली की आम्ही पहिले असतो मग काही लोक येऊन फोटो काढतात असा टोला देखील ठाकरेंनी विरोधकांना लगावला. आज जय महाराष्ट्राला पण धोका झाला आहे. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नका. सत्ता येथे सत्ता जाते पण नाव टिकलं पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा जन्म घरातील चूल पेटवण्यासाठी झालाय घर पेटवण्यासाठी नाही

शिवसेना हा राजकीय पक्ष नाही. शिवसेना विचार आहे. भाजपवाले संपवू शकत नाहीत. शिवसेना अन्याग्रस्तांच्या हदयात पेटलेली मशाल आहे. शिवसेना नसती तर यांना महापालिका मंत्रालय दिसले नसते असे ठाकरे म्हणाले. तरुण तरुणींना रोजी रोटी देण्याचं काम शिवसेनेने केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचा जन्म घरातील चूल पेटवण्यासाठी झालाय घर पेटवण्यासाठी नाही असे ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होताना ते वरुन बघत असतील, कदाचीत आपल्यातही ते असतील असे ठाकरे म्हणाले. आम्ही कधी निष्ठेचा बाजार मांडला नाही. मुंबईमध्ये शाखांमध्ये परत जाणार, आहे, जिथे पराभव झाला तिथेही जाणार, महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे ठाकरे म्हणाले. जय महाराष्ट्राचा जयघोष सुरु करा, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष सुरु करा, हर हर महादेवचा जयघोष करा विरोधकांना धडकी भरवाणार उद्घोष करा. महाराष्ट्रधर्म आणि देश वाचवायचाय असे ठाकरे म्हणाले. मला नाराज होऊन चालत नाही. मला सगळे शिवसैनिक सारखे आहेत. जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 24-01-2026