Ratnagiri : झाडगाव येथील श्री देवी जोगेश्वरी मंदिरात उद्या हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन

रत्नागिरी : झाडगाव येथील श्री देवी जोगेश्वरी मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ सायंकाळी ४ ते ७ हळदी-कुंकू समारंभाची वेळ आहे.

या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील सर्व महिलांनी उपस्थित राहून या मंगल सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन श्रीदेव भैरी, श्री देवी जोगेश्वरी, श्री देवी नवलाई पावणाई, श्रीदेव तृणबिंदुकेश्वर ट्रस्ट झाडगाव रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 24/Jan/2026