जागतिक आरोग्य संघटनेतून अखेर अमेरिका बाहेर!

न्यूयॉर्क: जागतिक आरोग्य संघटनेतून (डब्ल्यूएचओ) बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेने पूर्ण केली आहे. गुरुवारी अमेरिकी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सुमारे ७८ वर्षे या देशाची डब्ल्यूएचओशी असलेली कटिबद्धता या निमित्ताने संपुष्टात आली.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुमारे एक वर्षापूर्वी पदग्रहणाच्या पहिल्याच दिवशी याबाबत घोषणा केली होती. अमेरिकेने डब्ल्यूएचओला या निर्णयापोटी २६ कोटी डॉलर एवढी रक्कम द्यावी लागेल.

अमेरिकेची ही होती भूमिका

संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्य संस्था असलेल्या डब्ल्यूएचओला अमेरिका मोठ्या प्रमाणात निधी पुरवत होती. संघटनेच्या एकूण निधीपैकी सुमारे १८ टक्के निधी एकट्या अमेरिकेचा होता. यामुळे आता संघटनेच्या खर्चावर बऱ्याच मर्यादा येणार आहेत.

परिणाम काय?

अमेरिका या संघटनेतून बाहेर पडल्यामुळे जगातील आरोग्यासंबंधीचे धोक्यांची माहिती घेऊन त्याबाबत सहकार्य करण्याच्या प्रणाली आता कमकुवत होतील.
दुसरीकडे अमेरिकेने डब्ल्यूएचओतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यापासून संस्थेसमोर निधीचे संकट निर्माण झाले आहे. याशिवाय अमेरिकी शास्त्रज्ञ तसेच औषधी कंपन्यांच्या नवीन महामारीशी निपटण्यासाठी आवश्यक लसींच्या निर्मितीच्या क्षमतेवर परिणाम होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 24-01-2026