राजापूर : रत्नागिरी येथील ड्रीम्स इव्हेंटतर्फे फेब्रुवारी महिन्यात बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ४ या वेळेत शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. बालनाट्य महोत्सवाच्या उद्घाटनानंतर येथील पटवर्धन हायस्कूलतर्फे ‘धोंड’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. विदुला मुळ्ये, विभा कडव, शांभवी रेमणे, रमा कानविंदे, समृद्धी सावंत, त्वीशा भाटकर, ऋषिकेश मोंडकर, शौर्य मयेकर, दत्तात्रय नार्वेकर, समर्थ कोळी हे बालकलाकर नाट्यकृतीचे सादरीकरण करणार आहेत.
त्यानंतर देवगड येथील युथ फोरमतर्फे ‘लगोरी’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या बालनाट्यात स्वरा भुजबळ, मीरा भुजबळ, ओवी बापट, आर्या सावंत, कस्तुरी कांबळी, सावी मुद्राळे, सम्यक सकपाळ, अधिराज बलवान, ध्रुव दाभोळकर, मयंक धुरी, पार्थ नलावडे, सार्थक तेली या बालकलाकारांचा सहभाग आहे.
तसेच ‘चेटकिणीच्या बंगल्यात’ हे कोल्हापूर येथील अलंकार कला अकादमी सादर करणार आहे. यामध्ये आरोही गुळवणी, मुग्धा शिंदे, आरोही पवार, गार्गी गुळवणी, सारंग सोनुले, सोहम जाधव, वीरेन कापडी, स्वर विचारे, चैतन्य आयरेकर, अविराज मांगोरे, अनय देशपांडे, समर्थ घाटगे, समर्थ जगताप या बालकलाकारांचा समावेश आहे.
रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १५ अर्थात दामले विद्यालयाचे विद्यार्थी ‘काय ते जुनं’ ही नाट्यकृती सादर करणार असून, त्यामध्ये अर्णव सरपोतदार, सोहम कदम, आर्षती कारेकर, श्रवण महाले, गार्गी शेलार, सावनी सरपोतदार, श्रीराम पळसुलेदेसाई, स्वयंम शिंदे, सिद्धेश मोहकर, अनन्या माजरेकर, अनन्या देवस्थळी, तेज काळे या बालकलाकारांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 24/Jan/2026














