Ratnagiri : गणेशगुळे येथील स्वयंभू गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्साहात

पावस : रत्नागिरीत तालुक्यातील गणेशगुळे येथील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. गुरुवारी विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, आरती, कीर्तनकार ह.भ.प. उल्हास लाड यांचे जन्मोत्सव की र्तन, श्रींची पालखी मिरवणूक, महाप्रसाद वाटप, बुवा दामोदर लोकरे मुंबई व काडसिध्देवर प्रासादिक भजन मंडळ बुवा संदेश तोडणकर यांचे भजन, आरती, क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण, नाटक-वास्तव आदी कार्यक्रम पार पडले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेशगुळे श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिरचे अध्यक्ष प्रसाद तोडणकर, उपाध्यक्ष प्रज्योत गुळेकर, सचिव प्रथमेश रांगणकर, उपसचिव ओंकार वजरेकर, खजिनदार जितेंद्र तोडणकर, सहखजिनदार शैलेश जोशी, कार्याध्यक्ष विक्रम गुरव, उपकायाध्यक्ष संदेश मावळकर यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 26/Jan/2026