चिपळूण : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांची मालमत्ता किती?

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी सादर केलेली मालमत्ता कोटीच्या घरात आहे. या मालमत्तेत काही अलिशान वाहने, शेतजमीन, इमारतींचा समावेश आहे.

याशिवाय त्यांच्यावर चार कोटींचे कर्ज असल्याचेही त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या विवरणपत्रात नमूद केले आहे.

प्रशांत यादव यांनी गुरुवारी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी दिलेल्या मालमत्ता विवरणपत्रानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न ४० लाख ८८ हजार ४०० रुपये व त्यांची पत्नी स्वप्ना यादव यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाख ८५ हजार ३९७ रुपये इतके आहे. याशिवाय प्रशांत यादव यांच्याकडे ४५ हजार व त्यांच्या पत्नीकडे ५० हजार ५०० रुपये रोख स्वरूपात आहेत. विविध बँका व पतसंस्थांमध्ये प्रशांत यादव यांची १ कोटी २ लाख ७६ हजार ४६४ रुपये, तर स्वप्ना यादव यांची १६ लाख ९१ हजार ४४ रुपये इतकी ठेव आहे.

त्यांच्याकडे स्थूल मूल्य स्वरूपात ४ कोटी ५४ लाख ८१ हजार ४२१ रुपयांची, तसेच स्वप्ना यादव यांच्याकडे ५ कोटी ३४ लाख १५ हजार ९४६ रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये काही अलिशान गाड्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे ३४ लाख १७ हजार २२५ रुपयांची, तर त्यांच्या पत्नीकडे १ कोटी २२ लाख २० हजारांची शेतजमीन आहे. याशिवाय, प्रशांत यादव यांच्या नावे ४ कोटी ९१ लाख ८८ हजार ३५७ रुपयांचे आणि पत्नी स्वप्ना यादव यांच्या नावे २ कोटी २९ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे विविध बँकांचे कर्ज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 29-10-2024