Chiplun : उमरोली जिल्हा परिषद गटात रंगणार चौरंगी लढत

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद गटात चौरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या चार उमेदवारांमध्ये लढत रंगणार असून येथील एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने चौरंगी लढत रंगणार आहे.

तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद गटावर महायुतीतर्फे भाजपने दावा केला आहे. या ठिकाणी शिंदे शिवसेनेने उमेदवार दिलेला नाही. येथे ठाकरे शिवसेनेकडून प्रमोद निवळकर हे रिंगणात आहेत तर त्यांच्याविरोधात भाजपतर्फे योगेश शिर्के, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नीलेश चव्हाण, काँग्रेसतर्फे अनंत चव्हाण असे एकूण चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे उमरोली जि. प. गटात चौरंगी लढत होणार आहे तर या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले श्रीकांत निवळकर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी अवैध ठरवला आहे. अनामत रकमेच्या मुद्द्यावरून हा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे आता उमरोली जि.प. गटात चौरंगी लढत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 26/Jan/2026