रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठेत बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळी ८.५० वा. करण्यात आली. संतोष दाजी धामणे (५३, रा. खालगाव जाकादेवी भटवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी संशयित हा खालगाव जाकादेवी बाजारपेठेतील एका टपरीच्या आडोशाला मटका जुगार खेळ चालवत होता. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 26/Jan/2026














