रत्नागिरी : तालुक्यातील गावडे-आंबेरे येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची ५७० रुपयांची ५ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी एका महिले विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार २४ जानेवारी रोजी दुपारी २.३० वा. सुमारास करण्यात आली. अरुणा अनंत गोलटकर (वय ६५, रा. गावडेआंबेरे जुवळेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.
तिच्या विरोधात पोलिस उपनिरीक्षक संजय शिवगण यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी संशयित महिला विनापरवाना ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. तिच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 26/Jan/2026












