Weather update: प्रजासत्ताक दिनी राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज सविस्तर..

Republic Day Weather : उद्या व परवा सोमवार- मंगळवार दि.२६-२७ जानेवारी ला महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, जालना, छ.सं.नगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती अशा ११ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात ढगाळ वातावरणाची शक्यता असुन अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

नंतरची तेथील थंडी
दरम्यानच्या कालावधीत व त्यानंतरही ह्या ११ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात, शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी पर्यंतच्या १२ दिवसात पहाटेच्या किमान तापमानात काहीशी वाढ होवून सध्या जाणवत असलेल्या थंडीपेक्षा तेथे कमी थंडी जाणवेल.

खालील ठिकाणी पुढील ४ दिवस थंडी कायम
उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांत मात्र गुरुवार दि. २९ जानेवारीपर्यंत सध्या जाणवत असलेल्या थंडीसारखीच थंडी जाणवेल. मात्र दि. ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी (शुक्रवार ते शुक्रवार) पर्यंतच्या ८ दिवसात ह्या २५ जिल्ह्यातही थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता जाणवते.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील थंडी
शनिवार दि. ७ फेब्रुवारी पासुन उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता हळूहळू पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते. ह्याबाबत त्यावेळी सविस्तर खुलासा करता येईल.

– माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 26-01-2026