​मोठी बातमी: टाटा मोटर्सची पहिली ‘सिएरा’ साईचरणी अर्पण! शिर्डी संस्थानला पुणे विभागातील डीलर्सची अनोखी भेट

◼️ ​बुकिंगचा उच्चांक गाठणाऱ्या नवीन ‘टाटा सिएरा’ची पहिली चावी साईबाबांच्या चरणी; एस.पी. ऑटोहबचे अरुण देशपांडे यांची उपस्थिती


​शिर्डी/रत्नागिरी : टाटा मोटर्सच्या (Tata Motors) गाड्यांनी नेहमीच भारतीय रस्त्यांवर राज्य केले आहे. आता नव्याने बाजारात दाखल झालेल्या आणि बुकिंगचा उच्चांक मोडणाऱ्या ‘टाटा सिएरा’ (Tata Sierra) या कारचा पहिला मान शिर्डीच्या साईबाबांना मिळाला आहे. टाटा मोटर्सच्या पुणे विभागातील सर्व डीलर्सच्या वतीने नवीन टाटा सिएरा ही कार श्री साईबाबा संस्थानला (Shri Saibaba Sansthan) देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आली आहे.

​वितरण सुरू होण्यापूर्वीच बाप्पा चरणी

‘टाटा सिएरा’ ही कार नुकतीच बाजारात दाखल झाली असून, तिचे बुकिंग जोरात सुरू आहे. ग्राहकांना या गाडीचे वितरण सुरू होण्याआधीच, या मॉडेलची पहिली चारचाकी आज साईबाबांच्या सेवेत रुजू करण्यात आली. या वाहनाची विधिवत पूजा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (Goraksh Gadilkar) आणि टाटा मोटर्सचे डीलर्स यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी वाहनाची चावी अधिकृतरीत्या संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली. यानंतर संस्थानच्या वतीने सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सर्व डीलर्सचा सत्कार केला.

​कोकणासाठी अभिमानाची क्षण: अरुण देशपांडे

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान कोकणातील टाटा मोटर्सचे अधिकृत विक्रेते एस.पी. ऑटोहबचे (SP Autohub) श्री. अरुण देशपांडे यांनाही मिळाला. पत्रकारांशी बोलताना अरुण देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
​ते म्हणाले, “शिर्डी संस्थान येथे टाटा मोटर्सच्या वतीने प्रथमच लाँच होणारी ‘टाटा सिएरा’ ही कार भेट म्हणून प्रदान करण्यात आली, याचा आम्हाला मनापासून आनंद आणि अभिमान आहे. टाटा समूहासारख्या मूल्याधिष्ठित आणि सामाजिक जाणिवेने कार्य करणाऱ्या संस्थेशी आम्ही जोडले गेलो आहोत, ही बाब आमच्यासाठी अत्यंत गौरवास्पद आहे.”

​येथे साधा संपर्क

टाटा मोटर्सच्या या नवीन वाहनाबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहकांनी रत्नागिरी, चिपळूण, कणकवली किंवा ओरोस येथील ‘एस.पी. ऑटोहब’च्या शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 26-01-2026