पावस पंचक्रोशीत मुसळधार पाऊस

पावस : पावस पंचक्रोशीत गेले दोन दिवस पावसाच्या सरी कोसळत आहेत. हळव्या भाताला हा पाऊस धोकादायक ठरणार असून, काही ठिकाणी भात कापण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (ता. २३) दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

यावर्षी चांगला पाऊस पडल्याने भातशेती चांगली तरारली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी आहे. हळवी भातशेती कापणीस योग्य झाले आहे. मात्र, गेले दोन दिवस पुन्हा पाऊस पडू लागला आहे. काल विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू लागला. त्यामुळे हळवे भातपीक आडवे होण्याची शक्यता आहे. मात्र जास्त दिवसांच्या भातशेतीला हा पाऊस पोषक ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 24/Sep/2024