खेड : शहरातील जगबुडी नदी किनारी पोत्रिक मोहल्ला येथे बंदर रोड परिसरात रविवारी दि. २७ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास १३ फुटाचा महाकाय अजगर आढळून आला. प्राणीमित्रांना बोलावून तेथील नागरिकांनी अजगराला सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी मदत केली.
खेड बंदर परिसरातील पौत्रिक मोहल्ला येथील रहिवाशांना रविवारी दि. २७ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक सुमारे तेरा फूट लांबीचा अजगर दिसला. त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क केला व वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर या महाकाय अजगराला वन्यजीव बचाव पथकाने कोणतीही इजा न पोहोचवता ताब्यात घेतलं व त्याला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या घटनेनंतर शहरात या अजगराच्या आकाराबाबत चर्चा सुरू होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 29/Oct/2024














