◼️ स्वप्नातील घर खरेदीसाठी आजचा अंतिम दिवस
रत्नागिरी : क्रेडाई रत्नागिरी आयोजित वास्तूरंग प्रदर्शनाला रविवारी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी भेट दिली. एकाच छताखाली घराचे अनेक पर्याय क्रेडाईच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होत असल्याच्या या प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी यांनी विशेष कौतुक केले.
क्रेडाई रत्नागिरी यांच्याकडून वास्तूरंग 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलाव नजीक सातवा कोकण प्रॉपर्टी एक्स्पो भरवण्यात आला आहे. 23 जानेवारी रोजी आमदारा किरण सामंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 24 जानेवारी रोजी राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी या प्रदर्शनाला भेट देत वास्तूरंग प्रदर्शनाचे आणि क्रेडाई रत्नागिरीचे विशेष कौतुक केले होते.
रविवार 25 जानेवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी वास्तूरंग प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी वास्तूरंग प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देत माहिती घेतली. क्रेडाई रत्नागिरी यांच्या मार्फत आयोजित या वास्तूरंग प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी विशेष कौतुक केले. एकच छताखाली ग्राहकांना घरासह बँक लोन याबद्दल तात्काळ माहिती मिळत असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी क्रेडाई रत्नागिरीचे विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा क्रेडाई रत्नागिरी मार्फत विशेष सत्कार करण्यात आला. क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष महेश गुंदेचा यांच्यासोबत यावेळी दीपक साळवी, नित्यानंद भुते, श्री, तावडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 26-01-2026














