रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने नाशिक येथे नुकतेच राज्यस्तरावर आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा झाली. या स्पर्धेत मिस्त्री हायस्कूल रत्नागिरीच्या १४ वर्षांखालील मुलाच्या संघाने उत्कृष्ट विजय संपादन केले. मिस्त्री हायस्कूलने प्रतिस्पर्धी मुंबई विभागाचा उपांत्य पूर्व सामन्यात पराभव केला. अंतिम सामन्यात नागपूर विभागाला पराभव करून उत्तम विजय संपादन केले.
या सामन्यात आयान अन्सार सोलकर, शेरान शौकत वस्ता, गुफ्रान शेख, नुमान सैफान चरके, रफान सोलकर, जवाद वस्ता, जियान मुकादम, जियान होडेकर, जैन सोलकर, कैफ काझी, कासिम बोरकर, कासिम सोलकर, इमान माखाजनकर, असद भाटकर, अर्फिन पावसकर, रय्यान सोलकर, या मुलानी आपल्या दमदार खेळाने विरोधी संघाला पराभूत करून सदर संघ राज्य चषकाचे मानकरी ठरला. विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्रे बहाल करण्यात आली.
मिस्त्री हायस्कूलने टेनिस क्रिकेट स्पर्धेत यशस्वीरीत्या उत्तुंग भरारी घेतल्या बद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा, तालीमी इमदादिया कमिटीच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष निसार लाला, सचिव तन्वीर मिस्त्री, सहसचिव शकील मजगावकर, खजिनदार जाहीर मिस्त्री व मुंबईहून आलेले प्रमुख पाहुणे ईखलास फरीद, शाईस्ता फरीद, फुजेल मिस्त्री, अम्मारा मिस्त्री, ताबिन मिस्त्री, मैराज नार्वेल, आमेरा नार्वेल, रेहनुमा नार्वेल, शुजा नार्वेल, वाहिद जेठाम व संस्थेचे प्रमुख अधिकारी रफिक मुकादम, इकबाल मिस्त्री यांच्या वतीने यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षक सैफान चरखे यांचे आले. अभिनंदन करण्यात आले. या यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक थरातूनही यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 26/Jan/2026














