Chiplun : महानिर्मिती नाट्य स्पर्धेत कोरडी केंद्राच्या ‘द रेन इन द डार्क’ प्रथम

चिपळूण : कोयना जलविद्युत केंद्र पोफळी आयोजित महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेत कोराडी केंद्राचे ‘द रेन इन द डार्क’ हे नाटक प्रथम पारितोषिक प्राप्त ठरले येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे दि. १९ ते २३ जानेवारी दरम्यान या स्पर्धा झाल्या.

दि.२३ जानेवारीला नाट्यस्पर्धेचा पारितोषिक या वितरण समारंभ मोठ्या उत्साहात झाला. समारंभासाठी महानिर्मिती मुंबई मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, मुख्य अभियंता कोयना जलविद्युत केंद्र पोफळीचे संजय चोपडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी निवृत्ती कोंडावळे, अधीक्षक अभियंता प्रशासन संतोष चव्हाण अधीक्षक अभियंता मच्छिंद्र गायकवाड, रोहिदास आव्हाड, कल्याण अधिकारी प्रसाद निकम, महाव्यवस्थापक वित्त व सौर ऊर्जा माधुरी मुंडले, जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित आणि सुरक्षा अधिकारी सुनिल विचारे उपस्थित होते. तसेच या पारितोषिक वितरण समारंभाकरिता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची विशेष उपस्थिती होती.

या स्पर्धेत कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मिलिंद चन्ने दिग्दर्शित द रेन इन द डार्क या नाटकाला प्रथम, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूरचे मकरंद परदेशी दिग्दर्शित ‘दि अनॉनिमस’ या नाटकाला द्वितीय आणि भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे राजेश पवार दिग्दर्शित ‘धुमस’ या नाटकाला तृतीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

मिलिंद चन्ने यांना ‘द रेन इन द डार्क’ या नाटकासाठी दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक तसेच राजेश पवार यांना ‘धुमस’ नाटकासाठी द्वितीय आणि शैलेंद्र पाटील यांना ‘बदाम सात’ नाटकासाठी तृतीय पारितोषिक दिग्दर्शनासाठी मिळाले.

उत्कृष्ट अभिनय (पुरुष) यामध्ये सचिन मोडकवर यांना बाजीराव या भूमिकेसाठी प्रथम, शैलेंद्र पाटील यांना न्यूटन, आर्किमिडीज, शकुनी या भूमिकांसाठी द्वितीय, प्रवीण मोरे यांना ‘रंगा’ या भूमिकेसाठी तृतीय पारितोषिक मिळाले.

उत्कृष्ट अभिनय (स्त्री) यामध्ये ओवी ढवळे यांना जान्हवी या पात्रासाठी प्रथम क्रमांक, प्राची दाणी यांना उषाक्का या पात्रासाठी द्वितीय तर सायली देठे यांना छाया व प्रमिला या भूमिकेसाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. लक्षवेधी अभिनय (पुरुष) यामध्ये काळनाथ या भूमिकेसाठी महेश होनमाने यांना तर लक्षवेधी अभिनय (स्त्री) यामध्ये आई व शकुंतला या भूमिकेसाठी रूपाली बोंबारे यांना पारितोषिक मिळाले. नेपथ्यासाठी पारितोषिक दिगंबर इंगळे (प्रथम), रोशन वाघ (द्वितीय) आणि संदीप हिवरखेडकर (तृतीय) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

प्रकाश योजनेसाठी सचिन डांगोरे व धनराज गावनेर (प्रथम), अतुल बहऱ्हाटे (द्वितीय) आणि महेश तुपे व विशाल जाधव (तृतीय) यांना पारितोषिक मिळाले. संगीतासाठी मिलिंद चन्ने व सुनील मेश्राम (प्रथम), शिवाजी बोरकर व प्रियांका धंदर (द्वितीय), मोहित कांबळे (तृतीय) यांना पारितोषिक मिळाले. रंगभूषा व वेशभूषेसाठी गीतांजली झीरमुटे, रुपाली उफाडे व मानसी धानजी (प्रथम), ज्योती चंद्रमोरे (द्वितीय) आणि निकिता गोटे, चित्रा इंगळे (तृतीय) यांना पारितोषिक मिळाले. सूत्रसंचालन प्रा. सोनाली खर्चे आणि विजय कदम यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 26/Jan/2026