आज दिल्लीत भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात साजरा झाला. दिल्लीच्या कर्तव्यपथावरील संचलनावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित होते.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
इतिहासात प्रथमच दोन प्रमुख पाहुणे प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहिले आहेत.

कर्तव्यपथावर संचलन सुरु असताना पंतप्रधान मोदी युरोपियन पाहुण्यांना माहिती देत होते.
पंतप्रधान मोदींनी उर्सुला वॉन डेर लेयन यांना भारतीय संस्कृतीची माहिती दिली.
कर्तव्यपथावर संचलन करणाऱ्या भारतीय लष्कराची दले आणि चित्ररथांबद्दल मोदींनी युरोपियन पाहुण्यांना माहिती दिली.
उर्सुला वॉन डेर लेयन या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:02 26-01-2026














