रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील अडखळ येथे बेकायदेशीरपणे देशी दारूच्या १२ बाटल्या आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार २३ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. शिवाजी तुकाराम महाडिक (६४, रा. अडखळ मंडणगड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल विनय पाटील यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, संशयित हा शुक्रवारी रात्री एका घराच्या पाठीमागील आडोशाला आपल्या ताब्यात देशी दारुच्या ९६० रुपयांच्या १२ बाटल्या विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 26/Jan/2026














