रत्नागिरी : पावस ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पावस-सडा येथील कातळावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.५० वा. सुमारास करण्यात आली.
सुशांत सुभाष राज्ये (२५, रा. गोळप, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार सुदेश शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी संशयित हा आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना पावस-सडा येथे दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 26/Jan/2026














